• Mon. Dec 9th, 2024

मंगळवारी शहरातील श्रामणेर विधीकर्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप

ByMirror

May 15, 2022

बुद्ध पौर्णिमेचा अखिल भारतीय भिक्खू संघ अणि तथागत बुध्दिस्ट सोसायटीचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- बुद्ध पौर्णिमेनिमित्त अखिल भारतीय भिक्खू संघ अणि तथागत बुध्दिस्ट सोसायटी यांच्या वतीने टिळकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रामणेर विधीकर्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप मंगळवार दि.17 मे रोजी संध्याकाळी 4 वाजता होत आहे. यावेळी भगवान बुद्धांच्या रुपाची प्रतिष्ठापना जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व धार्मिक मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये केली जाणार असून, यावेळी सर्व समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


शहरासह दरेवाडी, नान्नज, जामखेड, शेवगाव या ठिकाणी सोमवारी (दि.16 मे) बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या रुपाची प्रतिष्ठापना होणार आहे. श्रामणेर विधीकर्ता प्रशिक्षण शिबीराच्या माध्यमातून बौध्द धर्माची दिक्षा देऊन, विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे दिले जात आहे. हे शिबीर यशस्वी करणारे श्रामणेर शिबिरार्थी, दान दाते, बौद्ध बांधवांना समारोपीय कार्यक्रमात प्रमाणपत्र, सन्मान पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.


या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष भदंत आनंद सुमनसिरी, भदंत मिलिंद बोधी, उपाध्यक्ष भदंत महामोग्गलायन, महासचिव भदंत सचित्त बोधी, भंते भारद्वाज, जि.प.सी.ओ. येरेकर, महापालिका आयुक्त शंकर गोरे, नगरसेवक राहुल कांबळे, स्थायी समिती सदस्य नगरसेवक प्रशांत गायकवाड, स्थायी समिती सदस्य अ‍ॅड. संतोष भानुदास गायकवाड, पाणी पुरवठा अधिकारी परिमल निकम, प्रा.अ‍ॅड. अर्जुनराव कांबळे, डॉ.प्रा. रत्ना वाघमारे, संध्याताई मेढे, डॉ. सिताताई भिंगारदिवे, रिपाई जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, संपर्क प्रमुख रोहित आव्हाड, नेते अजय साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, रिपाई (गवई) शहर जिल्हाध्यक्ष सुंशात म्हस्के, सुमेध गायकवाड, प्रतिक बारसे, अविनाश भोसले, संभाजी भिंगारदिवे, नाथा भिंगारदिवे, भाऊसाहेब पंचमुख, बाबासाहेब भांबळ, विलास साठे, विजय भांबळ, कास्ट्राईबचे राज्य पदाधिकारी एन.एम. पवळे, किशोर राजगुरू, राजीव साळवे, शिरीष गायकवाड, शिक्षक नेते राजकुमार साळवे, भिंगारदिवे, रिपब्लिकनचे सर्व संघटना पदाधिकारी, उपासक, उपासिका मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. शिबीर यशस्वी करण्यासाठी तथागत बुध्दिस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे, सचिव सत्येंद्र तेलतुंबडे, शिवाजी भोसले, आण्णासाहेब गायकवाड, दिपक अमृत, प्रकाश कांबळे, किशोर कांबळे, अविनाश कांबळे, धोंडिबा राक्षे, संतोष गायकवाड, विजय साळवे, प्रविण साळवे, मिलिंद आंग्रे, रंगनाथ माळवे, विशाल कांबळे, सिंध्दात कांबळे परिश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *