• Wed. Dec 11th, 2024

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या जिल्हाध्यक्षपदी अरुण खिची

ByMirror

Apr 20, 2022

सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडून सत्ताधारी व विरोधक एकमेकांचे भ्रष्टाचार आणि जातीयवादी मुद्दयांवर गरळ ओकत आहे -अरुण खिची

अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश (महाराष्ट्र राज्य) संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे व पश्‍चिम महाराष्ट्र सचिव सचिन खैरमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्‍चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी खिची यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी अ‍ॅड. रविंद्र लगड, केतन साठे, सुमंत सादूल, प्रसन्न कटारिया आदी उपस्थित होते.
रघुनाथ आंबेडकर म्हणाले की, लोकांनी लोकांसाठी बनवलेली लोकशाही यंत्रणा ही खरी यंत्रणा आहे. परंतु मधल्या काही वर्षापासून प्रस्थापित घराणेशाही, महागाई आणि शासन व प्रशासनामधील भ्रष्टाचाराने सर्वसामान्य जनता होरपळत आहे. सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी व भ्रष्टाचारमुक्त समाज घडविण्याकरिता संघटना कार्यारत असल्याचे त्यांनी सांगितले.
अरुण खिची यांनी राजकीय नेते, मंत्री व पुढार्‍यांसह त्यांच्या नातेवाईकांचे भ्रष्टाचार राजरोसपणे सुरु असून, सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडून सत्ताधारी व विरोधक एकमेकांचे भ्रष्टाचार आणि जातीयवादी मुद्दयांवर गरळ ओकत आहे. समाजासाठी व देशाला वाचविण्यासाठी पुन्हा भ्रष्टाचारमुक्तीसाठी स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागणार आहे. समाजात अन्याय, अत्याचार होणार्‍या दुर्बल घटकांना संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. खिची विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सेवा देत असून, या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदत होत आहे. संघटनेचे प्रदेश अध्यक्ष कैलाश सातपुते, प्रदेश सरचिटणीस अंबादास शिंदे, सल्लागार अ‍ॅड. अरविंद आंबेडकर, प्रदेश सचिव अमोल चिकणे, संपर्क प्रमुख संतोष कांबळे, बाबासाहेब कांबळे, सतीश अडगुळे, रविंद्र हनवते, महादेव माने आदी प्रदेश कार्यकारणीच्या पदाधिकार्‍यांनी त्यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *