अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 स्पर्धेचा थरार भुईकोट किल्ला मैदान येथे रंगला होता.
तब्बल आठ दिवस रंगलेल्या या स्पर्धेत फुटबॉल संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन रोमांचक क्षण प्रेक्षकांना अनुभवता आले.
अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटना (एडीएफए) चे माजी सचिव अलेक्स फर्नांडिस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती.
खेळाडूंनी आपल्या खेळातून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तर आपल्या उत्कृष्ट खेळाची चुणूक या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवली.
(सर्व छायाचित्रे- वाजिद शेख-नगर)