ज्ञानोबा-तुकोबा…, माऊली माऊली… च्या गजरात भिंगारमधून बाल वारकर्यांची दिंडी
अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भिंगार हायस्कूलच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांची उत्साहात दिंडी काढण्यात आली. शाळेच्या मैदानात बाल वारकर्यांचा शिस्तबध्द रिंगण सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ज्ञानोबा-तुकोबा…, माऊली माऊली… च्या गजरात भिंगारमधून निघालेल्या या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधले. पायजमा, बंडी या पोशाखात लहान मुले तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन डोक्यावर तुलस घेऊन मुली सहभागी झाल्या होत्या.
दिंडीचे प्रस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र बेद्रे यांच्या हस्ते पालखीची पूजनाने झाले. यावेळी उपमुख्याध्यापक रवींद्र लोंढे, पर्यवेक्षक भरतकुमार भालसिंग, गितांजली भावे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्षा रेखा बेरड, सचिव कैलास विधाटे, अनुराधा काळभोर, वृषाली शिंदे आदींसह शिक्षक उपस्थित होते.
शाळा समितीचे चेअरमन नंदकुमार झंवर यांनी पालखीचे स्वागत केले. विविध ठिकाणाहून मार्गक्रमण झालेल्या बाल वारकर्यांची दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शालेय समिती सदस्य संजय सपकाळ यांनी शाळेत पालखीचे पूजन करुन रिंगण सोहळ्याची सुरुवात झाली. शाळेच्या मैदानात हातात भगवे ध्वज, टाळ-मृदूंगच्या निनादात पालखी भोवती रिंगण करण्यात आले. डोक्यावर तुलस घेऊन मुली देखील रिंगण सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. विठ्ठलाच्या वेशभूषेत ऋतुजा शिंदे तर रुक्मिणीची वेशभूषा प्राची काळभोर या विद्यार्थिनींनी केली होती.
दिंडी सोहळ्यासाठी विकास साबळे, ज्ञानेश्वर मदने, महादेव साबळे, सतीश गुगळे, कदम सर, रुपेश पसपुल, संजय पाचारणे, यश बडदे, रमेश वाघमारे, संजय भंडारी, अनिल भोसले, गोंडाळ सर, किशोर महानोर, निलेश कमलकर, बुगे, दिलीप सकट यांच्यासह शालेय शिक्षकांचे सहकार्य लाभले. क्रीडा शिक्षक उन्मेश शिंदे व रमेश वाघमारे यांनी दिंडी सोहळ्यासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.