भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरात संत रविदास महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शुक्रवार बाजार तळ येथील चौकात लावण्यात आलेल्या संत रविदास महाराजांच्या प्रतिमेस भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, युवक जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, रमेश वराडे, मारुती पवार, राजेंद्र तोडमल, राहुल भडोरिया, दिलीप दुर्गेय्या, सर्वेश सपकाळ, गणेश भिडोरिया, दत्तात्रय भगत, दिपक भडोरिया, संतोष गायकवाड, लखन भडोरिया, दीपक दुर्गेय्या आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, मनुष्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संत रविदास महाराजांमुळे मिळाला. अंधश्रध्दा, रुंढी, परंपरेत खितपत पडलेल्या समाजाला त्यांनी दिशा दिली. जगण्याचा व भक्तीचा खरा मार्ग दाखवला. समतेचे विचार देऊन उच्च-निच्च भेद दूर करण्याचे काम त्यांनी केले. संत रविदास महाराजांची शिकवण सर्व समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे असल्याचे त्यांनी सांगितले.