भिंगारच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांचे नेहमीच योगदान राहिले -संभाजी भिंगारदिवे (कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष)
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीच्या वतीने विकास हे ध्येय व उद्दिष्ट ठेवून कार्य सुरू आहे. भिंगारच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांचे नेहमीच योगदान राहिले आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. कर्तव्यदक्ष आमदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांनी शहराला विकासाचे व्हिजन दिले असून, त्या दिशेने शहरासह उपनगरांचा विकास साधला जात असल्याचे कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे यांनी सांगितले.
एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमांतर्गत भिंगार येथील रोकडेश्वर मंदिरात पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये संवाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष भिंगारदिवे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, युवकचे शहर उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, विलास तोडमल, ओबीसी सेलचे अमित खामकर, मारुती पवार, मेजर दिलीप ठोकळ, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, सुभाष होडगे, अशोक पराते, विशाल बेलपवार, शिवम भंडारी, रामचंद्र शिंदे, मच्छिंद्र बेरड, गणेश शिंदे, संतोष हजारे, लहू कराळे, तुषार धाडगे, ईश्वर गवळी, संतोष हजारे, काशीनाथ साळुंके, भगवान दळवी, शशीकांत बोरुडे, बाळासाहेब राठोड, सदाशिव मांढरे, सिद्दूतात्या बेरड, ओमकार फिरोदे आदींसह नागरिक उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते यांनी प्रास्ताविकात पक्षाचे ध्येय-धोरण व उद्दीष्ट समाजातील सर्वसामान्य पर्यंत पोहचविण्याकरिता एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी अभियान राबविले जात आहे. देशाची व राज्यातील राजकारणाची वेगळ्या दिशेने वाटचाल सुरु असून, सर्वसामान्यांना शहाण करुन त्यांची भूमिका त्यांना समजावली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय सपकाळ म्हणाले की, राष्ट्रवादीने नेहमीच समाजकारणाला महत्त्व देऊन कार्य केले आहे. पक्षात राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व दिले जात आहे. या बैठकीतून पक्षाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचणार आहे. आमदार संग्राम जगताप यांनी या ध्येय-धोरणाने भिंगारचे विविध प्रश्न सोडविले. कोरोना काळात देखील भिंगारकरांना त्यांनी मोठा आधार दिला होता. भिंगारवर त्यांचे कायमच प्रेम राहिले असून, त्यांचे या भागातील विकास कामाकडे विशेष लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. अमित खामकर यांनी युवकांना राष्ट्रवादीत सन्मानाने काम करण्याची संधी दिली जात असून, युवकांची मोठी फळी आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीमागे उभी राहिली आहे. विकास हा अजेंडा सर्व युवकांना भावला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास तोडमल यांनी केले. आभार सुभाष होडगे यांनी मानले.