बुध्द विहारात भगवान गौतम बुध्दांना राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन
भगवान बुध्दांनी संपूर्ण जगाला करुणा आणि सहिष्णुतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुध्द पौर्णिमेनिमित्त भिमनगर येथील बुध्द विहार मधील भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी मेणबत्त्या प्रज्वलीत करुन गौतम बुध्दांच्या मुर्तीस गुलाबपुष्प अर्पण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, युवक उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, नाथाजी राऊत, ओबीसी सेलचे अमित खामकर, प्रा. कैलास मोहिते, दिपक बडदे, सुभाष होडगे, अर्जुन बेरड, मेजर दिलीप ठोकळ, सिध्दार्थ आढाव, विशाल बेलपवार, रामचंद्र शिंदे, काशिनाथ साळुंके, शिवम भंडारी, राधेलाल नकवाल, मच्छिंद्र बेरड, शशिकांत बोरुडे, भारत पवार, अरुण चव्हाण, तुषार धाडगे, किरण फटांगरे, नितीन भिंगारदिवे, प्रदिप जाधव, जनाभाऊ भिंगारदिवे, स्वप्निल शिंदे, सदाशिव मांढरे, विशाल कटावनरे, संजय भिंगारदिवे आदींसह नागरिक उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, भगवान बुध्दांनी संपूर्ण जगाला करुणा आणि सहिष्णुतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. त्यांनी दिलेल्या शिकवणी, संदेश आणि विचार मानवाला नैतिक मूल्यांशिवाय यशस्वी व समाधानी जीवन जगण्यासाठी माणसाला प्रेरणा देत असल्याचे सांगितले. संजय सपकाळ म्हणाले की, तथागत भगवान गौतम बुध्दांनी जीवनाचा खरा मार्ग दाखविला. त्यांनी माणवतेची शिकवण देऊन, समाजातील हिंसा, अशांती, अंधविश्वास आणि अधर्म दूर करण्याचे कार्य केले. भगवान बुध्द एक युग प्रवर्तक होते. त्यांनी संपूर्ण जगात आपल्या ज्ञानाची ज्योत पेटवली. त्यांचे कार्य व विचार आजच्या युगात दीपस्तंभाप्रमाणे असल्याचे त्यांनी सांगितले.