अहमदनगर (प्रतिनिधी)- भाळवणी (ता. पारनेर) माळवाडी येथील प्रति शनि शिंगणापुर असलेल्या मंदिरात शनि अमावस्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुणराव मुंडे यांच्या हस्ते महाआरती पार पडली. यावेळी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्यामजी बळप, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, दिलीप भालसिंग, भाजप तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे, बाळासाहेब पोटघन, सुभाष दुधाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी अभिषेक घालून, ह.भ.प. रामदास महाराज यांचे किर्तन झाले. महाप्रसादासाठी कृष्णाजी रोहोकले, भाउसाहेब चेमटे यांनी योगदान दिले. या सोहळ्यासाठी गोविंद कुंभकर्ण, नंदुशेठ चेमटे सहकार्य केले. यावेळी अॅड. संदीप रोहोकले, जगदीश आंबेडकर, डॉ. अभिजित रोहोकले, सुजित आंबेडकर, रमेश रोहोकले आदींसह भाळवणी व परीसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.