• Thu. Dec 12th, 2024

भारतीय सेनेत लेफ्टनंट ऑफिसरपदी नियुक्ती झाल्याबद्दल रागिनी गुंजाळ हिचा सत्कार

ByMirror

May 26, 2022

फॅशनच्या झगमगाटात गुंतलेल्या युवतींपुढे रागिनी गुंजाळ एक आदर्श -पै. नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- फॅशनच्या झगमगाटात गुंतलेल्या युवतींपुढे रागिनी गुंजाळ या युवतीने एक आदर्श निर्माण केला आहे. देश सेवेसाठी मुलींनी देखील सामाजिक कार्यासह सेनेत येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी केले.


भारतीय सेनेत लेफ्टनंट ऑफिसरपदी नियुक्ती झालेल्या रागिनी रंगनाथ गुंजाळ या युवतीचा निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय, जाधव परिवार व निमगाव वाघा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच रुपाली जाधव, दूध डेअरीचे चेअरमन गोकुळ जाधव, रतन गुंजाळ, रंगनाथ गुंजाळ, उद्योजक अजय लामखडे, डॉ. संतोष गुंजाळ, जयसिंग गुंजाळ, प्रमोद जाधव, माजी सरपंच साहेबराव बोडखे, भाऊसाहेब गुंजाळ, संभाजी जाधव, बाळू जाधव, सोमनाथ गुंजाळ, आण्णा जाधव आदी उपस्थित होते.


पै. डोंगरे पुढे म्हणाले की, सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने देश सेवेसाठी लेफ्टनंट ऑफिसर पदापर्यंत मजल मारली आहे. रागिनीने आपले कर्तृत्व सिध्द केले असून, तिच्या पासून मुलींना प्रेरणा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *