14 एप्रिलच्या जयंती दिनी अधिकार्यांना बाबासाहेबांच्या पुतळ्यास हार घालू देणार नाही
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीची कार्यकारणी जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने शनिवारी (दि.19 मार्च) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शहरात महापालिकेच्या वतीने महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज, माळीवाडा येथे महात्मा फुले, प्रोफेसर चौक सावेडी येथे छत्रपती संभाजी महाराज व मार्केटयार्ड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे नियोजन सुरू आहे. शहरातील आंबेडकर चळवळीतील विविध पक्ष, संघटनांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा मार्केटयार्ड चौकात बसवण्यात यावा म्हणून वेळोवेळी आंदोलन करून पाठपुरावा केला आहे. या प्रयत्नांना यश आल्याचे मनपाच्या हालचालीवरून दिसून येत आहे. त्याकरिता आंबेडकरी चळवळीतील विविध राजकीय पक्ष संघटना यांनी आपले राजकीय अस्तित्व बाजूला ठेवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा नगर शहरात स्थापन केला जावा. म्हणून एकत्र येत पूर्णाकृती पुतळा समिती स्थापन केली आहे.
या समितीच्या माध्यमातून बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात संदर्भातचा लढा देण्यात येणार आहे. या समितीमध्ये सर्वसमावेशक अशी कार्यकारणी व विविध उपसमित्या आज जाहीर करण्यात आल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यास संदर्भात शहराचे आमदार संग्राम जगताप व मनपाचे पदाधिकारी, अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य समितीला लाभत आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी त्यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाचे भूमीपुजन करण्याची मागणी समितीने लावून धरली आहे. अन्यथा कोणत्याही सरकारी अधिकार्याला पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दिले जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. पत्रकार परिषदेसाठी अजय साळवे, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, प्रतीक बारसे, बंडू आव्हाड, संजय कांबळे, प्रशांत गायकवाड, किरण दाभाडे, सोमा शिंदे, बंटी भिंगारदिवे, योगेश थोरात, सागर ठोकळ, नितीन खंडागळे, संतोष जाधव, संदीप वाघमारे आदी उपस्थित होते.
नियोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा संघर्ष समिती पदाधिकारी खालील प्रमाणे- अजय साळवे, रोहित आव्हाड, सुमेध गायकवाड, सुरेश बनसोडे, प्रतीक बारसे, संजय कांबळे, प्रशांत गायकवाड, राहुल कांबळे, किरण दाभाडे, सुशांत महस्के, सुनील शिंदे, योगेश थोरात, संतोष जाधव, नाथा अल्लाट, सुनील शेत्रे, सदाशिव भिंगारदिवे, वैभव कांबळे, सचिन शेलार, विशाल गायकवाड, प्रवीण चाबुकस्वार, जय कदम, सोमा शिंदे, विजय गायकवाड, संभाजी भिंगारदिवे, झेवियर भिंगारदिवे, अनिल शेकटकर, संजय जगताप, वृषाल साळवे, विशाल कांबळे, पिटू माघाडे.
नियोजन व व्यवस्थापन समिती प्रमुख- बंटी भिंगारदिवे, सागर ठोकळ, नितीन खंडागळे, दिनेश पंडित, विवेक भिंगारदिवे, विशाल भिंगारदिवे.
सोशल मीडिया प्रमुख- अमित काळे, योगेश साठे, संदीप राजापुरे, नाना पाटोळे, विशाल पवार, सर्पमित्र आकाश जाधव.
प्रसिद्धीप्रमुख- महेश भोसले, नितीन कसबेकर, सिद्धार्थ आढाव, संदीप वाघमारे, सचिन मोकळ.
संयोजन समिती- भरत कांबळे, पवन भिंगारदिवे, सुजित घंगाळे, विशाल गायकवाड, कौशल गायकवाड, विवेक भिंगारदिवे, संतोष जाधव, मेजर राजू शिंदे, समीर भिंगारदिवे, अविनाश शिंदे, सुरज कांबळे, भाऊ साळवे, अक्षय भिंगारदिवे, प्रतिक जाधव, अविनाश भोसले, मनोज साठे, सिद्धार्थ पाटोळे, मनोज ठाकूर, आकाश गायकवाड, दानीश शेख, शफी शेख, संदीप शिंदे, विजय महस्के, तुकाराम गायकवाड, मृणाल भिंगारदिवे, अजिंक्य भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे, वैभव जाधव, दया गजभिय, शनेश्वर पवार, सनी माघाडे, अतुल भिंगारदिवे, दीपक लोंढे, गौरव भाकरे, यशवंत भांबळ, सारंग पाटेकर, अंकुश मोहिते, जयंत भिंगारदिवे, अमोल तडके, अभिजित भिंगारदिवे, किरण जाधव, शुभम बडेकर, हर्षल कांबळे, आकाश तांबे, प्रवीण कांबळे, दिलीप कांबळे, मेहेर कांबळे, अमोल शिंदे, सागर चाबुकस्वार, सिमोन भाकरे, नितीन साळवे, आकाश सरोदे, जॉन पाटोळे, विलास उबाळे.
सल्लागार व मार्गदर्शक समिती- अशोकराव गायकवाड, अॅड..संघराज रुपवते, प्रा.जयंत गायकवाड, प्रा.विलास साठे सर, डॉ.प्रदीप तुपेरे, प्रा.डी आर जाधव, इंजि.परिमल निकम, इंजि.महेंद्र राजगुरू, भगवानराव जगताप, नगरसेवक विजय गव्हाळे, विजयराव भांबळ, प्रा. भीमराज पगारे, रवींद्र कांबळे, ड.संदीप पाखरे, ड कश्यप तरकसे, प्रा.डॉ.रत्ना वाघमारे, सुनील भाकरे, इंजि.संजय गायकवाड, उमाशंकर यादव, भगवान साळवे, पोपटराव जाधव, अण्णासाहेब गायकवाड, जितू मामा पाटोळे, अनंत लोखंडे, ड.प्रकाश राव गायकवाड, एकनाथराव जाधव, जीवन हरी पारदे.
महिला समिती- गौतमी भिंगारदिवे, अनुसया भाकरे, सौ.जयाताई गायकवाड, संपदा म्हस्के, हिराबाई भिंगारदिवे, संगीता भिंगारदिवे, सुनिता नेटके, मायाताई गायकवाड, अनुराधा साळवे, विनिता सूर्यवंशी, आरती बडेकर, ज्योतीताई पवार, माया निळे.