• Thu. Dec 12th, 2024

भाकप, आयटक व लाल बावटाच्या वतीने शिवाजी महाराजांना अभिवादन

ByMirror

Feb 19, 2022

शिवाजी महाराजांनी समता व विज्ञानवादी दृष्टीकोन दिला -अ‍ॅड. सुधीर टोकेकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक व लाल बावटा संलग्न अवतार मेहेर बाबा कामगार युनियनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील जुने बसस्थानक येथे असलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी भाकप व आयटकचे अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, अवतार मेहेर बाबा कामगार युनिट अध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, सुभाष शिंदे, राजू ढवळे, सुभाष करांडे, विकास कांबळे, अंबादास गव्हाणे, तलरेजा हाऊसचे कर्मचारी प्रदीप नारंग, सुरेश दळवी, जयवंत बोरुडे, विनोद वारे आदी उपस्थित होते.


अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी समता व विज्ञानवादी दृष्टीकोन दिला. लोककल्याणकारी राज्याची त्यांनी निर्मिती केली. शिवाजी महाराजांचे नांव घेऊन राजकारण करणार्‍या राजकीय पुढार्‍यांनी त्यांचा आदर्श समोर ठेऊन कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्याचे त्यांनी सांगितले. सतीश पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन करुन आधुनिक लोकशाहीचा पाया रचला. मानवी मुल्यांचा आदर्श त्यांनी जगासमोर आनला. राज्यात कामगारांवर अन्याय होत असताना शिवशाही अवरण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *