मौलवी व मदरसेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग
स्वातंत्र्य लढ्यात सर्व धर्मीयांचा त्याग – मतीन सय्यद
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत असलेल्या बाराबाभळी (ता. नगर) येथे जामिया मोहोम्मंदिया इशातुल उलूम मदरसा आणि मौलाना अबुल कलाम आझाद आयटीआय यांच्या संयुक्त विद्यमानाने जामिया मोहम्मदिया मदरसेत अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. असुन मौलवी व मदरसेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या झेंडावंदन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मदरसेचे ट्रस्टचे सेक्रेटरी मतीन सय्यद समवेत प्रमुख पाहुणे उद्योजक लॉरेन्स स्वामी यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी मदरसेचे नाजीम कारी अब्दुल कादिर, मौलाना अबुल कलाम आझाद, आयटीआयचे प्राचार्य नदीम शेख, मौलाना अन्वर ,मुक्ती इलियास, मौलाना अब्दुल हमीद, मौ नीसार शेख, मौ इलियास शेख, साबीर सर,वामन पगारे,सोनू कंडारे ,हुजेफा सर आदी उपस्थित होते.
मदरसातील विद्यार्थ्यांनी हातात तिरंगे ध्वज घेऊन झेंडावंदन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मतीन सय्यद म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा सर्व भारतीय नागरिकांसाठी उत्सवाचा दिवस असुन ज्या प्रमाणे स्वातंत्र्य लढ्यात सर्व धर्मिय, जाती, पंथानी योगदान दिले, त्याप्रमाणे या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सर्व सहभागी होत आहे. उत्सव सत्ताधार्यांच्या सांगण्यावरून नव्हे, तर सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून साजरा करण्यात आला आहे. देशात संविधानानुसार काम करणार्यांबरोबर सर्व समाज असल्याचे त्यांनी सांगितले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योजक लॉरेन स्वामी म्हणाले की मदरसेत स्वतंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात झेंडावंदन करण्यात आले. तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक उल्मांनी योगदान दिले. ते मदरसेतून घडले होते, असे त्यांनी सांगितले.