धार्मिक देखाव्यातून संस्कार रुजवण्याचे कार्य गणेश मंडळ करीत आहे -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या ब्रह्मांडनायक या धार्मिक देखाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवर्य राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते झाले.
35 बाय 35 फुटात हा भव्य देखावा साकारण्यात आला असून, श्री गुरुदेव दत्त यांच्या विविध रुपांची माहिती देण्यात आली आहे. श्री गुरुदेव दत्त व शंकरबाबा महाराज यांचे आकाशगंगेत असलेले चित्र सर्वांचे लक्ष वेधत आहे. या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, माजी उपमहापौर दीपक सूळ, सुरज जाधव, अक्षय डाके, ओबीसी सेलचे अमित खामकर, वैभव वाघ, संतोष लांडे, अंकुश चत्तर, सारंग पंधाडे, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिलदारसिंग बीर, कार्याध्यक्ष अजय दराडे, किरण डफळ, वरूण मिस्कीन, विकी मेहरा, महेश सब्बन, अमोल डफळ, विकी करोलीया, विकी वाणे, सचिन नराल, सोमनाथ लबडे, सुमित गोसके, कुणाल गोसके, प्रथमेश सांबार, मयूर चिलवर, रमेश औटी, सुरेश म्याना, पप्पु टोणे, रोहित म्याना, प्रीतेश डफळ आदींसह मंडळाचे कार्यकर्ते, परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, धार्मिक देखाव्यातून संस्कार रुजवण्याचे कार्य गणेश मंडळाच्या वतीने होत आहे. बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्ट अनेक वर्षापासून धार्मिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देत असून, त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. सुसंस्कारी पिढी घडविण्यासाठी धार्मिक शिक्षणाची देखील जोड असावी, असे त्यांनी सांगितले. गुरुवर्य राजाभाऊ कोठारी यांनी मंडळाने साकारलेल्या ब्रह्मांडनायक या देखाव्याचे कौतुक केले.
या देखाव्याची सजावट करणारे दिनेश मंजरतकर व गणेश जिंदम या कलाकारांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिलदारसिंग बीर यांनी प्रास्ताविकात बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. पाहुण्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. उपस्थितांनी ब्रम्हांडनायक स्वामी श्री गुरुदेव दत्त… यांचा जय घोष केला. देखावा पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहे.