राजकीय महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध
अहमदनगर (प्रतिनिधी)- सातार्यातील राज्य शासनाच्या विरोधात दंडुका आंदोलनात राजकीय महिलांविषयी बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदवून, त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन तोफखाना पोलीस स्टेशनच्या पो.नि. ज्योती गडकरी यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवतीच्या अंजली आव्हाड, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, ओबीसी सेलचे अमित खामकर, सुनिता गुगळे, गौरी बोरुडे, सुजाता दिवटे, सुप्रिया काळे, सरचिटणीस गणेश बोरुडे आदी उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणी राजकीय महिलांविषयी बेताल वक्तव्य करुन सर्व महिलांच्या भावना दुखावण्याचे काम बंडातात्या कराडकर यांनी केले आहे. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्रातील जनसामान्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवतीच्या वतीने करण्यात आली आहे.