फुटबॉलच्यारंगतदार सामन्यांचा थरार
अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 स्पर्धेत बुधवारी (दि.25 मे) आंबेडकर संघाने जेएफसी संघावर 5-3 गोलने विजय मिळवला. तर फिरोदिया शिवाजीयन्स संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत युनिटी एफसी संघावर 1-0 गोलने विजय संपादन केले.
भुईकोट किल्ला मैदान येथे सातव्या अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक स्पर्धेत रंगतदार सामने होत असून, फुटबॉल प्रेमींना हा थरार अनुभवयास मिळत आहे. आंबेडकर व जेएफसी संघाने सुरुवातीपासूनच एकमेकांवर कुरघोडी करत आक्रमक खेळी केली.
आंबेडकर संघाकडून महेश पटेकर, नवीन चौहान व संतोष मनोदिया यांनी प्रत्येकी 1 गोल तर शाहरुक शेख याने 2 गोल केले. जेएफसी संघाकडून प्रथमेश प्रणव व मोहितने प्रत्येकी 1 गोल केला. यामध्ये आंबेडकर संघाने जेएफसी संघावर 5-3 गोलने विजय मिळवला.
दुसरा सामना फिरोदिया शिवाजीयन्स विरुध्द युनिटी एफसी यांच्यात झाला. फिरोदिया शिवाजीयन्सकडून अरमान फकिर याने केलेल्या 1 गोलच्या जोरावर संघाला विजयश्री मिळाला. युनिटी एफसीने केलेली खेळी फिरोदिया शिवाजीयन्सच्या खेळाडूंनी परतून लावली. युनिटी संघाला शेवटच्या क्षणापर्यंत एकही गोल करता आला नाही. स्पर्धेसाठी पंच म्हणून रुषी पाटोळे, जॉय जोसेफ, सुशील लोट, सचिन पाथरे, प्रसाद पाटोळे यांनी काम पाहिले.