• Thu. Dec 12th, 2024

प्राचार्य पोट्ंयना बत्तीन यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

ByMirror

Jun 21, 2022

पोट्ंयना बत्तीन सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान व तारमा ट्रस्टचा सामाजिक उपक्रम

प्राचार्य पोट्ंयना बत्तीन यांनी श्रमिकांच्या जीवनात शिक्षणाची मशाल प्रज्वलीत केली -डॉ. रत्ना बल्लाळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली समाजाच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रणेते प्राचार्य गुरुवर्य पोट्ंयना बत्तीन यांची 134 वी जयंती गांधी मैदान येथील प्राचार्य बत्तीन पोट्ंयना प्राथमिक शाळेत सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना पोट्ंयना बत्तीन सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान व तारमा ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.


गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिरात झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य स्व. पोट्ंयना बत्तीन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. रत्ना बल्लाळ, संस्थेचे विश्‍वस्त राजेंद्र म्याना, पोट्ंयना बत्तीन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर मंगलारम, सचिव बालकृष्ण गोटीपामुल, तारमा ट्रस्टचे सदस्य विनायक कोडम, रवींद्र मडूर, मनोहर श्रीपत, विरभद्र बत्तीन, कुमार आडेप, अहमदनगर वधू वर मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जोग, मार्कंडेय माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक पांडुरंग गोने, पर्यवेक्षिका सरोजिनी रच्चा, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्याल, सुवर्णा गोंटला, सरोजनी आतकरे, पुष्पा म्याकल आदींसह शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


डॉ. रत्ना बल्लाळ म्हणाल्या की, प्राचार्य पोट्ंयना बत्तीन यांनी श्रमिकांच्या जीवनात शिक्षणाची मशाल प्रज्वलीत करुन समाजाला शिक्षणाची प्रकाशवाट दाखवली. श्रमिक कामगारांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले. त्यांनी दिलेले योगदान न विसरता येणारे असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित पाहुण्यांनी प्राचार्य पोट्ंयना बत्तीन यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *