16 व 17 जुलै रोजी रंगणार स्पर्धा
खेळाडूंनी सहभागी होण्याचे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा अॅम्युचर्स अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने प्रवरानगर (ता. लोणी) येथील प्रवरा पब्लिक स्कूल येथे 16 व 17 जुलै रोजी दोन दिवसीय जिल्हास्तरीय कनिष्ठ गटातील अॅथलेटिक्स स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे कार्याध्यक्ष रंगनाथ डागवाले, उपाध्यक्ष सुनिल जाधव, प्रा. बाळासाहेब विखे यांनी केले आहे.
ही स्पर्धा वयोवर्षे 14, 16, 18, 20 मुले व मुली या गटात होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून शनिवार दि.16 जुलै रोजी मुलांच्या तर रविवारी 17 जुलै रोजी मुलीच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेचे वैशिष्टये म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धेप्रमाणे फोटो फिनिश कॅमेरा असणार आहे. त्यामुळे कोणत्याही खेळाडूचे नुकसान न होता निकाल अचूक लागणार आहे.
या स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात देणार आहे. तर त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा थलेटिक्स संघटने कडून करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज घेण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 12 जुलै असून,
http://smrsports.in/athletic/registration/1656071651vMWqkWHDXHCosGXvfLWnt0OOeFlbERGz
या लिंकवर क्लिक करून प्रवेश निश्चित करण्याचे सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी दिनेश भालेराव 9226238536, राहुल काळे 8830863116 व संदीप हारदे 9657603732 हे नंबर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.