जिल्ह्यात 24 तर शहरात 16 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा 2022 मध्ये शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे सर्वाधिक 40 विद्यार्थी चमकले आहे.
जिल्ह्यात 24 तर शहरात 16 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान पटकाविला असल्याची माहिती प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी दिली. विद्यार्थ्यांना उर्मिला साळुंके, सुजाता दोमल, मीनाक्षी खोडदे, जयश्री खांदोडे, शितल रोहोकले, सचिन निमसे, राहुल शिंदे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचे दादाभाऊ कळमकर, ज्ञानदेव पांडुळे, अभिषेक कळमकर, निरीक्षक टी.पी. कन्हेरकर, प्राचार्य एस.एल. ठुबे आदींनी अभिनंदन केले.
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचा प्रज्ञाशोध परीक्षा 2022 निकाल पुढीलप्रमाणे:-
जिल्हा गुणवत्ता यादी (इयत्ता दुसरी) जिल्ह्यात सातवा क्रमांक- खराडे यशश्री नवनाथ, नरसाळे अपेक्षा रावसाहेब, नऊवा क्रमांक- रोहोकले स्वराज संतोष, उंडे सई शेखर, पालवे ईशान हरी, सायकड श्रेयस बाळासाहेब, दहावा क्रमांक- शेळके अण्विका प्रवीण.
इयत्ता तिसरी जिल्ह्यात दुसरा क्रमांक- गोरे सिद्धेश विनायक, पाचवा क्रमांक- झरेकर ऋग्वेद योगेश, नऊवा क्रमांक- चंदन आरुष रविंद्र, दहावा क्रमांक- जावळे अमृणी संदिप, अहिरे सोहम दिगंबर, अकरावा क्रमांक- वाळके श्रेया दिगंबर, तेरावा क्रमांक- पळसकर तनया प्रविण.
इयत्ता चौथी जिल्ह्यात तिसरा क्रमांक- औटी अवनी सचिन, चौथा क्रमांक- झावरे स्पर्श अशोक, सातवा क्रमांक- फाटक आयुष रविंद्र, नाबगे सत्यजित संजय, आठवा क्रमांक- मिसाळ अनन्या पाटीलसाहेब, मोकशे सुरभी शिवाजी, पगारे हर्षवर्धन विलास, नऊवा क्रमांक- गोसावी आर्यन अनिल, अकरावा क्रमांक- चेमटे अवनी नितीन, बर्वे आदित्य प्रकाश.
केंद्र गुणवत्ता यादीत इयत्ता दुसरी प्रथम-खराडे अगण्या गणेश, द्वितीय-अनभुले स्वराली नारायण, तृतीय-आढाव सायली अनिल, इयत्ता तिसरी प्रथम- महानवर वेदश्री सचिन, द्वितीय- कासार संस्कृती विजय, चेमटे वेदांत बापूसाहेब, तृतीय- येवले दिलीप प्रदीप, झरेकर यश विकास, इयत्ता चौथी प्रथम- शिंदे पृथ्वीराज शेखर, द्वितीय- मुर्तडक सिद्धार्थ बाळासाहेब, तृतीय- गुंड श्रावणी अशोक, हिंगे आर्या भिमाजी, पोकळे ऋचा मोहन, फडतरे गौरव ज्योतिराम, सुंबे आदित्य निलेश, तोरकड कौस्तुभ अनिल यांनी यश संपादन केले. या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.