रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी कोरोना काळात प्रभावीपणे रक्तदान शिबीर घेतल्याचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असताना, जनकल्याण रक्तकेंद्राच्या माध्यमातून उत्कृष्टपणे रक्तदान शिबीर राबविल्याबद्दल स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांना रक्तदान शिबीर संयोजक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमात उद्योजक श्रीहरी टिपुगडे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे प्रकल्प संचालक डॉ. अनंत पंढरे यांच्या हस्ते डोंगरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जनकल्याण रक्तकेंद्राचे अध्यक्ष राजेश झंवर, उपाध्यक्ष संतोष डुंगरवाल, कार्यवाह डॉ. दिलीप धनेश्वर आदी उपस्थित होते.
जनकल्याण रक्तकेंद्राच्या माध्यमातून सन 2019 ते 2021 मध्ये प्रभावीपणे रक्तदान शिबीर राबविणार्या सामाजिक संस्थांचा गौरव करण्यात आला. रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने कोरोना काळात ग्रामीण भागात प्रभावीपणे रक्तदान शिबीरे घेण्यात आली. यामुळे गरजूंना वेळेत रक्ताची उपलब्धता झाली. या कार्याचा सन्मान म्हणून डोंगरे संस्थेचे अध्यक्ष डोंगरे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.