23 तारखेला जास्तीत जास्त दिव्यांगांनी नोंदणी करण्याचे सावली दिव्यांग संघटनेचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग बांधवांना आयुष्यात स्वावलंबी करण्यासाठी कृत्रीम सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एडीआयपी 2021-22 योजनेअंतर्गत भारत सरकारच्या सामाजीक न्याय व अधिकारीता मंत्रालय, जिल्हा समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फांउडेशन संचलीत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 23 मार्च 2022 रोजी पारनेरच्या बस स्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सकाळी 11 ते 2 या वेळेत सहाय्यक साधन वाटप नाव नोेंदणी शिबीराचे आयोजन कण्यात आले आहे या शिबीरात सहभाग नोंदवून आवश्यक साधनासाठी नाव नोदणी करण्याचे आवाहन सावली संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा निर्मला भालेकर, रखमा कावरे, अरूण गवळी, चांद शेख व बाहुबली वायकर यांनी केले आहे.
सदर शिबीरामध्ये शारीरीकदृष्टया दिव्यांग व्यक्तीस तीन चाकी सायकल, व्हिलचेअर, एल्बो कुबडी, कुबडी, काठी, कृत्रीम अवयव, कॅलीपर, सेरेब्रल पाल्सी खुर्ची, अंध व्यक्तीसाठी ब्रेल किट (शाळेतील मुलांसाठी), डैसी प्लेअर(पुस्तक वाचण्यासाठी), मोबाईल फोन, अंध काठी, कर्णबधीरांसाठी श्रवणयंत्र, मतिमंदासाठी मतिमंद किट (14वर्षाखालील), मोटारचलीत तीनचाकी सायकल आदी साहीत्य वाटप होण्याकरिता नोंदणी होणार आहे.
नोंदणी शिबीरासाठी दिव्यांग प्रमाणपत्र (एस.ए.डी.एम.), आधार कार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट साईज दोन फोटो, उत्पन्नाचा दाखला आदीची छायांकीत प्रत सोबत आणणे अनिवार्य असल्याची माहिती सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी दिली आहे.