जय आनंद फाउंडेशनचा (ग्रुप) उपक्रम
समाजबांधवांना लाभ घेण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- आत्मशुध्दी व क्षमाभाव वृध्दींगत करणार्या जैन धर्मातील पवित्र अशा पर्युषण महापर्वास बुधवार (दि.24 ऑगस्ट) पासून सुरुवात होत आहे. मंगळवार दि. 30 ऑगस्टपर्यंत सात दिवस चालणार्या या पर्वानिमित्त शहरातील जय आनंद फाउंडेशन (ग्रुप) च्या वतीने जैन बांधवांसाठी दालमंडई येथील राजेशकुमार कमलेशकुमार गुगळे यांच्या निवासस्थानी जेवणाची (ब्याळू) व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमाचे हे आठवे वर्ष आहे.
पर्युषण महापर्वात दररोज सायंकाळी 5 ते 6.30 या कालावधीत भोजन व्यवस्था चालू राहणार आहे. पर्युषण कालावधीत सूर्यास्तापूर्वी भोजन केले जाते. दालमंडई, आडतेबाजार, कापडबाजार, मार्केट यार्ड, त्याचप्रमाणे बाहेरगावाहून खरेदी करण्याकरिता येणार्या व्यावसायिक अशा सर्व जैन बांधवांना या भोजन व्यवस्थेचा लाभ घेता येणार आहे.
जय आनंद फाउंडेशनच्या वतीने 2014 रोजी ह्या उपक्रमाची सुरवात करण्यात आली होती. बाजारपेठेत ब्याळूला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जय आनंद फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून इतरही विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ब्याळुची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून, समाजबांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जय आनंद फाउंडेशनचे संस्थापक व मर्चंट्स बँकेचे संचालक कमलेश भंडारी व जय आनंद फाउंडेशनचे अध्यक्ष रितेश पारख यांनी केले आहे.