दीड वर्षापासून होता तुरुंगात
अहमदनगर (प्रतिनिधी)- सायबर क्राईम पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात मागील दीड वर्षापासून तुरुंगात असलेल्या परदेशी नागरिक स्मिथ जॉन काबरो यास जिल्हा न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला.
फेसबुक वरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून नंतर व्हाट्सअप वर ओळख करून फिर्यादीला हर्बल ऑइल बिजनेसचे अमिष दाखवून फसवल्याप्रकरणी आरोपीस 29 जानेवारी 2021 रोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने दोन वेळा आरोपीचा जामीन नाकारला होता.
त्यानंतर आरोपी स्मिथ जॉन याने अॅड. सरिता साबळे यांच्यामार्फत तिसर्यांदा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयात दाखल केला होता. अॅड. साबळे यांनी आरोपी हा परदेशी नागरिक असल्याच्या कारणाने जामीन नाकारता येत नाही, कायदा सर्वांसाठी समान असून परदेशी नागरिकास जामीन मिळण्याचा संपूर्ण अधिकार आहे. तसेच या गुन्ह्यात शिक्षाही सात वर्षाची आहे आणि केस संपूर्ण चालवून संपण्यास विलंब होईल व त्यासाठी आरोपी यास अनिश्चित काळासाठी जेलमध्ये ठेवणे योग्य नसल्याच्या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. सदर बाबी विचारत घेता जिल्हा न्यायालयाने आरोपीस अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. आरोपीतर्फे अॅड. सरिता एस. साबळे यांनी काम पाहिले.