भगवान शंकराच्या मंदिरातील शिवलिंगला दुग्धाभिषेक
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पंजाबी सनातन धर्मसभा ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्री साजरी करण्यात आली. सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात असलेल्या भगवान शंकराच्या मंदिराच्या गाभार्यातील शिवलिंगला दुग्धाभिषेक घालण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता, काकाशेठ नय्यर, संजय धुप्पड, प्रदीप पंजाबी, सुभाष जग्गी, राजीव बिंद्रा, प्रीतपालसिंह धुप्पड, किरण विजन, राजेंद्र कंत्रोड, विरेंद्र ओबेरॉय, हरजितसिंह वधवा, अजय पंजाबी, जनक आहुजा, अनिल सबलोक, पंडित महेंद्र शर्मा, पियुष जग्गी, हितेश ओबेरॉय, ब्रिज बक्षी, बिल्लू अंदोत्रा, पिंकी मक्कर आदींसह सीए झालेल्या मुलांचे पालक, शीख, पंजाबी व सिंधी समाज बांधव उपस्थित होते.
नुकतेच झालेल्या सीए फायनल परीक्षेत जिल्ह्यात दुसरा आलेला अमरनाथ सहानी तसेच रितेश राजू जग्गी, सिमरन सहानी, ओमकार विजन यांचा सत्कार करण्यात आला. राकेश गुप्ता म्हणाले की, कोरोनाच्या संकटातून समाज सावरत असताना सण, उत्सव काळात सर्व समाजबांधव एकत्र येत आहे. समाजाला एकत्र करुन विकासात्मक दिशेने वाटचाल सुरु असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावर्षी समाजातील चार युवक-युवतींनी सीए परीक्षेत यश संपादन केले पंजाबी, सिंधी समाज बांधव शक्यतो व्यापारात गुंतलेले असतात. मात्र समाजातील सध्याचे युवक-युवती सीए, डॉक्टर, इंजीनिअर आदी क्षेत्रात यश संपादन करत आहे. हे युवक समाजाचे भूषण असल्याचे सांगून सीए झालेल्या युवकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपस्थित भाविकांना यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले. भगवान शंकराच्या मंदिराच्या गाभार्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.