हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन
देशामध्ये शांतता, सुख, समृध्दी व धार्मिक ऐक्यासाठी प्रार्थना
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुस्लिम बांधवांची रमजान ईद नगर तालुक्यातील नेप्ती येथे उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील शाही मस्जिदच्या मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केली. मौलाना मुनीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करुन, देशामध्ये शांतता, सुख, समृध्दी व धार्मिक ऐक्यासाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली.
मुस्लिम बांधवांना गावातील हिंदू व इतर धर्मियांनी ईदच्या शुभेच्छा देत एकमेकांना आलिंगन दिले. यावेळी हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडले. मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन ग्रामस्थांनी शीरखुर्माचा आस्वाद घेतला. तसेच गावातील सय्यद सहाब दर्गाह येथे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी माजी सरपंच दिलीप होळकर, विठ्ठल जपकर, माजी उपसरपंच फारुक सय्यद, समता परिषदेचे नगर तालुकाध्यक्ष रामदास फुले, बाबूलाल सय्यद, वाजिद सय्यद, सत्तर सय्यद, जमीर सय्यद, मुख्तार सय्यद, भूषण सय्यद, हुसेन सय्यद, नौशाद शेख, सिकंदर शेख, आय्युब सय्यद, गुलाब सय्यद, सलीम सय्यद, युनूस सय्यद, हंन्सार सय्यद, कय्युम सय्यद, बादशाह सय्यद, उमर सय्यद, रफिक सय्यद, मोईन सय्यद, आसिफ सय्यद, आसिफ शेख, प्रा. एकनाथ होले, जावेद सय्यद, बाबुभाई सय्यद आदींसह नाले हैदर यंग पार्टीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.