• Thu. Dec 12th, 2024

नेप्तीत महापुरुषाची पुण्यतिथी व जयंती रक्तदानाने साजरी

ByMirror

Aug 1, 2022

रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

भारतीय संस्कृतीत रक्तदानाला मोठे महत्त्व -नानासाहेब बेल्हेकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबीर पार पडले. या शिबीरात युवकांसह ग्रामस्थांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. यावेळी रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


गावातील संत सावता महाराज मंदिरात कै. बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल रक्तपेढी व नानासाहेब बेल्हेकर यांच्या पुढाकाराने मित्र परिवाराच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन या शिबिराचे उद्घाटन सरपंच सुधाकर कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी समता परिषदेचे तालुकाप्रमुख रामदास फुले उपसरपंच जालिंदर शिंदे, माजी उपसरपंच शिवाजी होळकर, ग्रा.पं.सदस्य नितीन कदम भानुदास फुले, शाहूराजे होले, सचिन जपकर, सुभाष होले, पांडुरंग मोरे, युवराज कर्पे, विनायक बेल्हेकर, सुरेश कदम, वसंत कदम आदी उपस्थित होते.


नानासाहेब बेल्हेकर म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये रक्तदानाला मोठे महत्त्व असून दानाला असून, अन्नदान, वस्त्रदान, भूदान व गोदान पेक्षाही श्रेष्ठ रक्तदान आहे. रक्तदानाने एखाद्या व्यक्तीला जीवदान मिळत असते. रक्तदात्याला जीव वाचविण्याचे पुण्य मिळत असते. कोरोनानंतर निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा युवकांच्या पुढाकाराने अटोक्यात येणार आहे. याआधीही गावात विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत गावातील सर्व युवक एकत्र आल्यास गावाचा मोठ्या प्रमाणात विकास होणार असल्याचे सांगून, त्यांनी रक्तदानाचे आवाहन केले.


कार्यक्रमासाठी महेंद्र चौगुले, दादाभाऊ दरेकर,अनिल पवार, अक्षय कांडेकर, सुभाष होले, सागर कर्पे, सुरज पवार, दीपक साळवे, विलास बेल्हेकर, जिजाबापू होळकर, नितीन होळकर, सुभाष नेमाने, गणेश होळकर, गणेश ठुबे, गणेश वाघ, अविनाश होळकर, सचिन होळकर, गोपीनाथ होले, अमोल चौगुले, भाऊसाहेब जपकर आदींसह युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी संतोष काळे, लॅब टेक्निशियन पल्लवी मोरे, परिचारिका योगिता गायकवाड हसन तालेब यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *