होले परिवाराचा स्तुत्य उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) मधील शालेय विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. स्व. सुलोचना किसन होले यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त होले परिवाराच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
कीर्तनकार ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी आपल्या किर्तनातून माणुसकीचा उपदेश करुन, महिला ही शक्तीचे रुप असून तिचा सन्मान राखण्याचे सांगितले. यावेळी नेप्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तर नेप्ती माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लिहिण्याचे पॅड व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक किशोर खजिनदार, प्राथमिकचे मुख्याध्यापक सुरेश कार्ले, पोलीस पाटील अरुण होले, प्रा. एकनाथ होले, दादू चौगुले, रामदास फुले, तुलसाबाई कदम, नाना घोडके, राजेंद्र झावरे, अरुण दळवी, बाळासाहेब शेटे, राधा जपकर, महेश जाधव, पाराजी चौरे, राजश्री कोल्हे, मिनाक्षी काठमोरे, बाबूलाल सय्यद आदी उपस्थित होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सचिन कोतकर, मा.पं. स. सदस्य किसन होले, साई संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुनाथ होळकर, जिल्हा मजुर फेडरेशनचे चेअरमन अर्जुन बोरुडे, अक्षय कर्डिले, हरिभाऊ कर्डिले, रभाजी सुळ, आबा सोनवणे, सबाजी गायकवाड, प्रशांत गायकवाड, माजी सरपंच संजय जपकर, दिलीप होळकर, शिवाजी होळकर, विठ्ठल जपकर, बबन गडाख, बाळासाहेब होळकर, वसंत पवार, फारुख सय्यद, अंबादास पुंड, सत्तार सय्यद, जावेद सय्यद, अनिल पवार, जमीर सय्यद, उमेश नगरकर, मिठू कुलट, छबुराव कांडेकर, अरुण फलके, डॉ. सुनिल गंधे, साहेबराव बोडखे, नाना डोंगरे आदी उपस्थित होते. या उपक्रमास होले परिवाराचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.