टाळ मृदूंगाच्या गजरात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी
नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयात शाळेचा पहिला दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये सहभागी झालेल्या बालवारकर्यांनी टाळ मृदूंगाच्या गजरात भजनातून शिक्षणाचा संदेश दिला.
नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, रामदास चौरे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत करुन, सर्वशिक्षा अभियानातंर्गत मोफत पाठ्यपुस्तक, गुलाबपुष्प व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी मुख्यध्यापक किसन वाबळे, निळकंठ वाघमारे, दत्तात्रय जाधव, विठ्ठल फलके,कला शिक्षक उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, सुवर्णा जाधव, भानुदास लंगोटे, तुकाराम खळदकर, लहानबा जाधव आदींसह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रास्ताविकात किसन वाबळे यांनी कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी घेतलेल्या उपक्रमाची माहिती दिली. पै.नाना डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.