• Wed. Dec 11th, 2024

निमगाव वाघा येथील हरिनाम सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने सांगता

ByMirror

May 31, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा धार्मिक वातारवणात उत्साहात पार पडला. ह.भ.प. दत्तात्रय महाराज जगताप (केडगाव) यांच्या काल्याच्या किर्तनाने या सप्ताहाचा समारोप झाला.
सकाळी गावात टाळ, मृदंगाच्या गजरात तर विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंडी प्रदक्षिणा मिरवणुक काढण्यात आली. यामध्ये महिला डोक्यावर तुलसी कलश घेऊन तर भजनी मंडळाचे सदस्य उत्सफुर्तपणे सहभागी झाल्या होत्या. दत्तात्रय महाराजांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


काल्याच्या किर्तनात जगताप महाराज यांनी श्रीकृष्ण चरित्रावर उजाळा टाकून, आजच्या कलियुगात जीवनाच्या सुख, समाधानासाठी नामस्मरणाचा संदेश दिला. त्यांनी सादर केलेल्या श्रीकृष्ण चरित्र कथेत उपस्थित भाविक भक्तीरसात न्हाऊन निघाले. या सप्ताहाच्या सांगताप्रसंगी ह.भ.प. विठ्ठल महाराज खळदकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ह.भ.प. दत्तात्रय महाराज जगताप यांचा ग्रामस्थांच्या वतीने ह.भ.प. भाऊसाहेब महाराज जाधव यांनी सत्कार केला. या सप्ताहामध्ये सकाळ, संध्याकाळ विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहा यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण चौरे, बन्सी जाधव, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, भाऊसाहेब आनंदकर, जयराम जाधव, चंद्रकांत जाधव, दत्तात्रय फलके, छगन भगत, तुकाराम खळदकर, सुभाष शिंदे, बाबा खळदकर, सुभाष पुंड, सुरेश शिंदे, भागचंद जाधव, तुळशीराम वाघुले, रामदास जाधव, श्याम जाधव, पोपट भगत आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *