अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील वत्सलाबाई दामोधर ठाणगे यांचे (वय 81 वर्षे) मंगळवारी (दि.6 सप्टेंबर) वृद्धापकाळाने निधन झाले. ते अत्यंत मनमिळावू, कष्टाळू व धार्मिक स्वभावाचे असल्याने सर्वांना सुपरिचित होत्या.
त्यांच्या पश्चात भाऊ, एक मुलगा, दोन मुली, सुन, जावई, पुतणी, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. भाऊसाहेब ठाणगे यांचे त्या मातोश्री होत. त्यांचा अंत्यविधी गावातील ठाणगे वस्ती येथे शोकाकुळ वातावरणात झाला. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.