• Wed. Dec 11th, 2024

निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयाचा दहावी बोर्डाचा शंभर टक्के निकाल

ByMirror

Jun 18, 2022

स्वराली फलके 91 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथील नवनाथ विद्यालयाने इयत्ता दहावी बोर्डाच्या परिक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली असून, विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. विद्यालयाच्या गुणवत्ता यादीत प्रथम- स्वराली कोंडीबा फलके (91.20 टक्के), द्वितीय- तृप्ती संदीप कापसे (91 टक्के), तृतीय- स्नेहल प्रकाश जाधव (90.80 टक्के) येण्याचा मान पटकाविला.


तिन्ही विद्यार्थी सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील असून, उत्तम प्रकारे गुण मिळवून त्यांनी आपली गुणवत्ता सिध्द केली आहे. संस्थेचे अध्यक्ष साहेबराव बोडखे, सचिव भागचंद जाधव, मुख्याध्यापक किसन वाबळे, सरपंच रुपाली जाधव, उपसरपंच अलका गायकवाड, ग्रामपंचयात सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, गोकुळ जाधव, भाऊसाहेब ठाणगे, गोरख चौरे, भाऊसाहेब जाधव, अण्णा जाधव, दिलावर शेख, सुखदेव जाधव, कोंडीभाऊ फलके, मच्छिंद्र कापसे, शंकर गायकवाड यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे आभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *