शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा सहभाग
वाडी-वस्तीवरील घरोघरी तिरंगा वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमातंर्गत निमगाव वाघा (ता. नगर) येथे तिरंगा रॅलीसह विविध उपक्रम राबविण्यात आले. गावातील सर्व शाळांमध्ये विविध स्पर्धा पार पडल्या. तर वाडी-वस्तीवरील घरोघरी नागरिकांना तिरंगा ध्वज वितरीत करण्यात आले.
नवनाथ विद्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी घर घर तिरंगाच्या जागृतीसाठी रॅली काढली होती. हातात तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थ्यांनी भारत माता की जय…, वंदे मातरम….च्या घोषणा दिल्या. तर ग्रामस्थांना ग्रामपंचायतच्या वतीने तिरंगा ध्वज वाटण्यात आले.
या उपक्रमासाठी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक किसन वाबळे, निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, अशोक डौले, भानुदास लंगोटे, तुकाराम खळदकर, लहानू जाधव, राजू शिंदे, सुभाष जाधव, दिपक आंग्रे, घनश्याम कदम, संदिप डोंगरे, भाऊसाहेब जाधव, बाळू फलके, किरण ठाणगे, विजय भगत, प्रकाश वाघुले, भाऊसाहेब डोंगरे उपस्थित होते.
सरपंच रुपाली जाधव व ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड यांनी ग्रामस्थांना घरावर तिरंगा झेंडा फडकविण्याचे आवाहन करुन, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी पंचायत समिती, जिल्हा क्रीडा कार्यालय व नेहरु युवा केंद्राचे मार्गदर्शन लाभले.