विकासकामात राजकारण न करता सर्वसामान्य ग्रामस्थांच्या सोयी-सुविधांसाठी कटिबध्द -आ. निलेश लंके
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील सारंग वस्तीच्या प्रलंबीत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार निलेश लंके व पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते झाले. मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेतंर्गत सदर रस्त्याच्या मुरुमीकरण व खडीकरण कामाचा समावेश आहे.
आमदार लंके व पद्मश्री पवार यांच्या यांच्या प्रयत्ननातून या रस्त्याचे काम मार्गी लागले असून, या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी सरपंच रुपाली जाधव, उद्योजक अरुण फलके, माजी सरपंच साहेबराव बोडखे, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, अण्णा जाधव, भाऊसाहेब ठाणगे, जयसिंग आमले, संपत कापसे, अनिल डोंगरे, अतुल फलके, कचरु कापसे, भरत फलके, एकनाथ डोंगरे, पिंटू जाधव, भानुदास कापसे, गोरख चौरे, संजय फलके, पिनू जाधव, सुनिल जाधव, साहेबराव जाधव, राजू हारदे, लक्ष्मण चौरे, शिवाजी जाधव, शिवाजी फलके, एकनाथ जाधव, पै. किरण जाधव, नारायण फलके, गुलाब जाधव, अमोल वाबळे, तात्या काळे, भाऊसाहेब जाधव आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे यांनी निमगाव वाघातील ग्रामस्थ, महिला व शालेय विद्यार्थ्यांना या रस्त्याची मोठी गरज होती. पावसाळ्यात नागरिकांना या रस्त्यावरुन जाता येणे देखील अवघड झाले होते. शेतकरी वर्गाला रस्ता नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत होता. हा रस्ता होत असल्याने सर्व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार निलेश लंके यांनी मतदार संघातील वाडी-वस्तीवर ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्यात येत आहे. विकासकामात राजकारण न करता सर्वसामान्य ग्रामस्थांच्या सोयी-सुविधांसाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. पद्मश्री पोपट पवार यांनी निमगाव वाघातील ग्रामस्थांचा या रस्तामुळे दळणवळणाचा प्रश्न सुटणार असल्याचे स्पष्ट केले. सारंग वस्ती येथे होत असलेल्या या रस्त्याच्या कामात निमगाव वाघा गावठाण ते सतीश फलके वस्ती 1 कि.मी. व रावसाहेब वैराळ ते गुलाब फलके वस्ती 1 कि.मी. च्या रस्त्याचे मुरुमीकरण व खडीकरण करण्याचे काम अंतर्भूत आहे.