राजमाता जिजाऊ यांचा आदर्श समोर ठेऊन मुलांवर संस्कार करण्याची गरज -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्यासाठी राजमाता जिजाऊंनी शिवबा घडविले. मातेने मुलांवर केलेल्या संस्काराने भावी पिढी घडत असते. राजमाता जिजाऊ यांचा आदर्श समोर ठेऊन मुलांवर संस्कार करण्याची गरज आहे. जिजाऊ ते राणी लक्ष्मीबाई तर स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणार्या सावित्रीबाई फुले यांचा इतिहास या मातीशी जोडला गेलेला असून, युवतींना हा वारसा पुढे चालवून त्यांच्या प्रेरणेने आपले कार्यकर्तृत्व गाजविण्याचे आवाहन डोंगरे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी केले.
निमगाव वाघा (ता.नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. नवनाथ विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पै. डोंगरे बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक किसन वाबळे, निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, दत्तात्रय जाधव, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, सुवर्णा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, मंदाताई डोंगरे, भानुदास लंगोटे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याध्यापक किसन वाबळे यांनी राजमाता जिजाऊंचे कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडून त्यांचा आदर्श अंगीकारल्यास खर्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरणार असल्याचे सांगितले.