वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश
गणेशोत्सवात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शाडूच्या मातीची गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तर वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
डोंगरेवस्ती येथे श्री नवनाथ पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष एकनाथ डोंगरे यांच्या हस्ते श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, सचिव मंदाताई डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, किरण ठाणगे, सोमा डोंगरे, नवनाथ फलके, अक्षय पवार, रितेश डोंगरे, दादा डोंगरे, प्रतिभा डोंगरे, कृष्णा डोंगरे, कार्तिक डोंगरे आदी उपस्थित होते.
गणेश उत्सवानिमित्त निमगाव वाघात संस्थेच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यसनमुक्ती व पर्यावरणावर घरगुती देखावा व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर जनजागृतीसाठी पथनाट्याचे आयोजन करुन मतदार जागृती, स्त्री जन्माचे स्वागत, स्त्री सक्षमीकरण, व्यसनमुक्तीचा संदेश दिला जाणार आहे. युवकांसाठी स्वच्छता अभियान व वृक्षरोपण अभियान देखील राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी दिली. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात व जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे, दिपाली बोडखे, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.