डॉ. मुखर्जी यांनी जनसामान्यांमध्ये ज्वाजल्य राष्ट्रभक्ती निर्माण केली -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी करण्यात आली. मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मुख्यध्यापक किसन वाबळे, निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, शुभांगी धामणे, मंदा साळवे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदिप डोंगरे, भानुदास लंगोटे, तेजस केदारी, अशोक डौले आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, राष्ट्रहितासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. त्यांनी जनसामान्यांमध्ये ज्वाजल्य राष्ट्रभक्ती निर्माण केली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यध्यापक किसन वाबळे यांनी राजकारणात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दिलेले योगदान विशद केले. या कार्यक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.