एकता फाऊंडेशनचा उपक्रम
सरकारच्या कल्याणकारी योजना लाभार्थी पर्यंत पोहचविण्यासाठी एकता फाऊंडेशन प्रयत्नशील -अतुल फलके
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) श्रमिक, कष्टकरी, शेतमजूर व हातावर पोट असलेल्या असंघटित कामगारांसाठी एकता फाऊंडेशनच्या वतीने मोफत ई श्रम कार्डची नोंदणी करुन त्याचे वितरण करण्यात आले. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सोसायटी सदस्य अतुल फलके यांच्या हस्ते ई श्रम कार्डचे वितरण झाले. यावेळी अरुण अंधारे, राहुल फलके, फिरोज शेख, सतीश उधार, रामदास पवार, किरण जाधव, संपत फलके, मच्छिंद्र फलके, करण फलके, गौरव काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
अतुल फलके म्हणाले की, निमगाव वाघात असंघटित श्रमिक, कष्टकर्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, त्यांची ई श्रम कार्डची नोंदणी झालेली नव्हती. शहरात जाऊन त्यांना नोंदणी करणे शक्य नसल्याने त्यांच्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. सरकारच्या कल्याणकारी योजना शेवटच्या लाभार्थी पर्यंत पोहचविण्यासाठी एकता फाऊंडेशन प्रयत्नशील आहे. ई श्रम कार्डधारकांच्या माध्यमातून शासनाला लाभार्थी असलेल्या असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबवून त्याचे लाभ थेट त्यांच्या पर्यंत घेऊन जाता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमास निमगाव वाघातील असंघटित श्रमिक, कष्टकर्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. गावाच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला. नोंदणी करणार्या असंघटित श्रमिक कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ, क्षमतेप्रमाणे रोजगाराच्या संधी, एक वर्षासाठी मोफत विमा तसेच विविध कल्याणकारी योजनांच लाभ मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.