ग्रामीण भागात वाचन संस्कृत बहरण्यासाठी धर्मवीर सार्वजनिक वाचनालयाचे कार्य प्रेरणादायी -आ. निलेश लंके
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास कवी आनंदा साळवे यांनी पुस्तके भेट दिली. ग्रामीण भागात वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी वाचनालयाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असून, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसह इतर ग्रंथ व पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या चळवळीला हातभार लावण्यासाठी कवी साळवे यांनी पुस्तके भेट दिली.
वाचनालयाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्याकडे कवी साळवे यांनी आमदार निलेश लंके यांच्या हस्ते पुस्तके सुपुर्द केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, सहाय्यक अधिव्याख्याता डॉ. शैलेंद्र भणगे, प्राचार्या गुंफा कोकाटे, लायन्स मिडटाऊनच्या अध्यक्षा संपुर्णा सावंत, उद्योजक अजय लामखडे, सिने कलाकार आशिष सातपुते, माजी सरपंच साहेबराव बोडखे, सरपंच रुपाली जाधव, उपसरपंच अलका गायकवाड, श्रीकांत मांढरे, मुख्याध्यापक किसन वाबळे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, धर्मवीर वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रियंका डोंगरे, सचिव मंदाताई डोंगरे, उद्योजक दिलावर शेख, भाऊसाहेब ठाणगे, मिराबक्ष शेख, डॉ. विजय जाधव, भागचंद जाधव, सुनिल जाधव, उत्तम कांडेकर आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या टाळेबंदीत विद्यार्थी वाचनापेक्षा मोबाईलमध्ये गुंतली गेली. वाचनाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास होत असतो. ग्रामीण भागात वाचन संस्कृती पुन्हा बहरण्यासाठी धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचे कार्य प्रेरणादायी असल्याची भावना आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केली. पै. नाना डोंगरे यांनी विद्यार्थी हे देशाचे उद्याचे भविष्य असून, त्यांना सक्षम व ज्ञान संपन्न बनविण्यासाठी वाचनालयाच्या माध्यमातून कार्य सुरु आहे. वाचनालयाच्या रुपाने बीजरोपण करण्यात आले आहे. या वाचनालयाच्या माध्यमातून गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निळकंठ वाघमारे, चंद्रकांत पवार, दत्तात्रय जाधव, भाऊसाहेब डोंगरे, शुभांगी धामणे, मंदा साळवे, प्रतिभा डोंगरे, सुवर्णा जाधव यांनी परिश्रम घेतले.