मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांच्या हस्ते झाला सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या यामिनी नरेंद्र लोहार यांना राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुंबई येथील मराठा मंदिरात लोहार यांना अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार व संयुक्त सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी राज्य सरचिटणीस दिलीप जगताप मुंबई प्रदेशाध्यक्ष जोंधळे, युवक मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रणजीत जगताप, महिला प्रदेशाध्यक्ष कविताताई भोसले, मराठा महासंघाचे जिल्हा संघटक पै. नाना डोगरे, दक्षिण जिल्हाध्यक्ष बिभिषण खोसे, उत्तर जिल्हाध्यक्ष राज गवांदे, गंगाधर बोरुडे, सतीश पठाडे, श्यामराव पवार, पुरुषोत्तम सोमवंशी, अर्चना शहा, सुनिल चौधरी आदी उपस्थित होते.
यामिनी लोहार यांचे महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य सुरु आहे. विविध सामजिक उपक्रम राबवून गरजू घटकांना त्या सातत्याने मदत करीत असतात. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.