स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात आयोजित करण्यात आलेल्या नगर वेल्थ गेम्स संग्राम चषकचा बक्षिस वितरणाने समारोप झाला. या स्पर्धेला शहरातील खेळाडूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला होता. या चषक अंतर्गत घेण्यात आलेल्या बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, क्रिकेट व फुटबॉल स्पर्धेतील विजेते खेळाडू व संघांना जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, माजी नगरसेवक निखिल वारे, उद्योजक अमोल गाडे, प्रा. शहाजीराव उगले, डॉ. सौरभ पंडित, डॉ. सोले, इंजि. ओंकार म्हसे, उद्योजक दीपक वाघ, आंतरराष्ट्रीय खेळाडू राजेश पुंडे, प्रशांत पालवे, इंजि. ललित क्षीरसागर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व इंजिनिअर केतन क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून नगर वेल्थ गेम्स संग्राम चषकाचे आयोजन करण्यात आले होते. नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, सावेडी येथे क्रिकेट तर तपोवन रोड येथे फुटबॉल स्पर्धा पार पडली.
तब्बल आठशे ते हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवला. क्रिकेट मध्ये रायझिंग इलेव्हन या संघाने तर फुटबॉल मध्ये हसलर या संघाने विजेतेपद पटकाविली. तसेच बॅडमिंटन मध्ये 21 विजयी व उपविजयी खेळाडू, अॅथलेटिक्स मध्ये पहिल्या तीन क्रमांकाच्या 25 खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. यावेळी उद्योजक मयूर रोहोकले, रवींद्र राऊत, आशुतोष पानमळकर, अनिकेत पानमळकर, दिग्विजय जाधव, अतुलराजे भोसले, जयंत जर्हाड, मयूर कल्हापुरे, आर्किटेक्ट मच्छिंद्र चिपाडे,उद्योजक विराज जाधव, इंजिनिअर अनिल मुरकुटे, डॉ. सौ. विखे, उद्योजक विद्यासागर पेटकर, निशिकांत महाजन, राष्ट्रवादी क्रीडा सेलचे शहर जिल्हाध्यक्ष घनश्याम सानप आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी जे.एम.आर. इन्फ्रास्ट्रक्चर, रॉस्क बिल्डकॉन, रामकृष्ण इंजीनियरिंग कन्सल्टंट अकॅडमी यांचे सहकार्य लाभले.