आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने मुंबईत गौरव
केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले यांच्याकडून सिसोदे यांच्या कार्याचे गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मराठा आघाडीचे राज्य संघटक सिद्धार्थ उपेंद्र सिसोदे यांना मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने ईलाईट अवॉर्ड ऑफ ऑनर ने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेचे संस्थापक डॉ. सनी शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष नशीत अफरोज यांच्या हस्ते सिसोदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदच्या वतीने बाळ गंगाधर टिळक मेमोरियल अवॉर्ड 2022 नुकतेच पार पडले. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात येते. या वर्षीचा ईलाईट अवॉर्ड ऑफ ऑनर सिसोदे यांना देण्यात आला आहे.
सिद्धार्थ सिसोदे रिपाईचे मराठा आघाडीचे राज्य संघटक म्हणून कार्य पाहत आहे. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिसोदे यांनी हा पुरस्कार त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, याचे संपूर्ण श्रेय त्यांच्या आई डॉ.सुरेखा पत्नी संध्या आणि त्यांचे नेते केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले यांना जात असून, त्यांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याचे सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले यांनी सिसोदे यांच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.