अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेत नगरच्या तक्षिल अंकुश नागर यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. नुकतीच ही स्पर्धा सांगली येथे पार पडली. यामध्ये संपुर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
तक्षिल नागर याने लॉन टेनिस स्पर्धेच्या दहा वर्षा आतील वयो गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अंतिम सामन्या पर्यंत मजल मारली. या स्पर्धेत तो उपविजयी ठरला. तो आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे. पुणे येथील फिनेस अॅकेडमी मध्ये वैभव अवघडे यांच्या मार्गदर्शनाखाली तो लॉन टेनिसचा सराव करतो. या यशाबद्दल त्याचे आठरे पाटील स्कूल संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल आठरे, मुख्याध्यापिका अनघा चेंबुरकर यांनी शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.