• Thu. Dec 12th, 2024

दिव्यांग खेळाडू अभिजीत माने याला यशवंत सेनेचा युवा गौरव पुरस्कार प्रदान

ByMirror

Jun 8, 2022

मतीमंद असूनही जलतरणच्या राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल

अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत विजयाची हॅट्रीक करणारा तर राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या नगर मधील दिव्यांग खेळाडू अभिजीत माने याला यशवंत सेनेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात यशवंत सेनेचा जिल्हा मेळावार पार पडला. यामध्ये माने याला यशवंत सेनेचे राज्याध्यक्ष माधव गडदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वडिल जगन्नाथ माने, जिल्हाध्यक्ष विजय तमनर, शहराध्यक्ष कांतीलाल जाडकर, राजेंद्र नजन, रत्ना पाटील, शर्मिला नलावडे, प्रा. डॉ. सुभाष अडावतकर, मुंबई शिवसेनेचे नंदकुमार जाधव, संजय बारहाते, पै. नाना डोंगरे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.


अपंगत्वावर मात करुन आई-वडिलांनी अभिजीत सारखा दिव्यांग खेळाडू घडवला आहे. मतीमंद असताना सुध्दा त्याने मिळवलेले यश प्रेरणादायी असल्याची भावना माधव गडदे यांनी व्यक्त केली. अभिजीत माने हा नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथील उत्कृष्ट जलतरणपटू असून, तो टिळक रोड येथील मतीमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थी आहे. आई सुनंदा व वडिल जगन्नाथ माने यांनी अभिजीत मतीमंद असल्याने त्याला क्रीडा क्षेत्राची गोडी निर्माण केली. तर मोठ्या कष्टाने त्याला जलतरणाचे धडे दिले. त्याने जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत विजयाची हॅट्रीक करुन, नागपूर व गोंदिया येथे झालेल्या दिव्यांग खेळाडूंच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. काही वर्षापूर्वी त्याचे मातृछत्र हरपले, या दु:खातून सावरुन तो पुन्हा जलतरण स्पर्धेसाठी वडिल जगन्नाथ माने यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज होत आहे. त्याच्या कर्तृत्वाची दखल घेऊन यशवंत सेनेच्या वतीने युवा गौरव पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *