• Wed. Dec 11th, 2024

दिव्यांगांना सहानुभूतीपेक्षा सन्मानाने आधार देणे प्रत्येकाचे कर्तव्य -आमदार संग्राम जगताप

ByMirror

Jun 14, 2022

अनामप्रेम संस्थेत दिव्यांग विद्यार्थ्यांसह आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस साजरा

गारदे परिवाराचा सामाजिक उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग मुले हे समाजातील घटक असून, त्यांना सहानुभूतीपेक्षा सन्मानाने आधार देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दिव्यागांना एका दिवसाच्या मदतीमधून मोठी मदत होणार नसली तरी, हा सामाजिक विचार रुजवला जाणार आहे. त्यांना आपल्यापणाने जवळ करणारे माणसे उभी राहिल्यास त्यांचे मनोधैर्य नक्कीच वाढणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


गांधी मैदान येथील अनामप्रेम संस्थेत आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस गारदे परिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी आमदार जगताप बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, ओबीसी सेलचे अमित खामकर, अनंत गारदे, सचिन गारदे, राहुल गारदे, अशोक गुंजाळ, अनाम प्रेमचे अजित कुलकर्णी, सुजित काकडे, संतोष ढाकणे, राजेश भालेराव, वैभव वाघ आदी उपस्थित होते.


पुढे आमदार जगताप म्हणाले की, दिव्यांगांना प्रवाहात आनण्याचे कार्य अनामप्रेम संस्था करीत आहे. दिव्यांगांना संस्थेचा मोठा आधार मिळात असून, त्यांना पायावर उभे करण्याचे प्रेरणादायी कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात शहराला विकासाला चालना देणारे व दूरदृष्टीचे नेतृत्व आमदार संग्राम जगताप यांच्या रुपाने लाभले. ते नेहमीच वंचित घटकांच्या पाठिशी उभे राहिले असून, अनामप्रेम व दिव्यांग बांधवांना त्यांची नेहमीच मदत मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


अनंत गारदे म्हणाले की, शहराच्या विकासाला चालना देऊन आमदार संग्राम जगताप यांनी नेहमीच दीन-दुबळयांना मदतीचा हात दिला आहे. शहरात युवकांची मोठी फळी उभारुन विकासात्मक चैतन्य निर्माण केले आहे. त्यांचे नेतृत्व विकासाकडे घेऊन जाणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार जगताप यांच्या हस्ते अनामप्रेममधील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *