सोडतमध्ये सोनाली गावडे ठरल्या भाग्यवान विजेत्या
अहमदनगर (प्रतिनिधी)- दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या पाईपलाईन रोड येथील शाखेत अक्षय तृतीया निमित्ताने खरेदी करणार्या ग्राहकांसाठी ठेवण्यात आलेल्या बक्षिसांची सोडत नुकतीच काढण्यात आली. या सोडतीमध्ये सोनाली वैभव गावडे या भाग्यवान विजेत्या ठरल्या. त्यांना कुलरचे बक्षिस देण्यात आले. यावेळी संचालक सचिन दहिवाळ, शितल दहिवाळ, संतोषी भिसे, प्रिया मद्दा, सोनाली गावडे आदी ग्राहक उपस्थित होते.
दहिवाळ सराफच्या वतीने दरवर्षी ग्राहकांसाठी वेगवेगळे बक्षिसे ठेवण्यात येत असून, त्याचे सोडत पध्दतीने वाटप केले जाते. बक्षिस मिळालेल्या सोनाली गावडे यांनी उपनगरात विश्वासाहार्तने दहिवाळ सराफ खरवंडीकरमध्ये सोने, चांदीचे दांगिने खरेदी केले जातात. विविध प्रकारचे आकर्षक डिजाईन असलेले दागिने महिलांना भुरळ घालत असून, एकाच छताखाली सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
नवनाथभाऊ भगवानराव दहिवाळ खरवंडीकर यांची 43 वर्षांची विश्वसनीय सुवर्ण परंपरा असलेले दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या वतीने दीपावली पाडवा, गुढीपाडवा, महिला दिन, यांसह अनेक वर्षभरातील विविध सणानिमित्ताने ग्राहकांसाठी सोडत पध्दतीने बक्षिसे वाटप केली जातात. दहिवाळ सराफ दालनामध्ये गळ्यातील मोत्यांचा हार, पायातील पैंजण, गंठण, बोरमाळ, नाकातील नथ, चांदीचे भांडे यांसह विविध डिजाईनचे दागिने उपलब्ध असून, दालनाला भेट देण्याचे आवाहन संचालक सचिन दहिवाळ यांनी केले आहे.