• Mon. Dec 9th, 2024

डीसीपीएस धारक शिक्षकांना सातव्या वेतन आयोग फरकाचा दुसरा व तिसरा हप्ता मिळण्याची मागणी

ByMirror

Jul 20, 2022

डीसीपीएस धारक शिक्षकांच्या शिष्टमंडळाने घेतली शिक्षणाधिकारी यांची भेट

पुढील महिन्यात दुसर्‍या हप्त्याची तरतूद करण्याचे आश्‍वासन

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील भविष्य निर्वाह निधी योजना लागू नसलेल्या डीसीपीएस/एनपीएस धारक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोग फरकाचा दुसरा व तिसरा हप्ता देण्याची मागणी डीसीपीएस धारक शिक्षकांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना वैभव सांगळे, सचिन कोटमे, सुशील नन्नवरे, कविराज बोटे, अरुण इघे यांनी दिले.


सदर प्रश्‍नाबाबत शिक्षकांच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी कडूस यांच्याशी चर्चा केली. शिक्षणाधिकारी यांनी या प्रश्‍नाची तात्काळ दखल घेऊन वेतन पथक अधिक्षिका स्वाती हवेले यांच्याशी चर्चा घडवून आणली. पुढील महिन्यात ऑनलाईन दुसर्‍या हप्त्याची तरतूद केली जाईल व ज्या शाळेच्या 2019-20 च्या डीसीपीएसच्या राहिलेल्या पावत्या देण्यात येणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले असल्याचे शिष्टमंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

डीसीपीएस धारक शिक्षकांच्या वतीने शिष्टमंडळाने डीसीपीएस धारकांना 2019-20 या वर्षीच्या पावत्या तात्काळ देण्यात याव्या, लवकरात लवकर दुसरा व तिसरा हप्ता देण्यात यावा, एनपीएस धारक शिक्षकांना त्यांच्या प्राण नंबर वर एनपीएस किट देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *