अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा दखनी भाषेचे अभ्यासक प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांना दिल्ली येथील साहित्य अकादमीचा भाषा सन्मान जाहीर झाल्याबद्दल त्यांचा शहरातील डाव्या पुरोगामी पक्ष व संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कॉ. अॅड. सुभाष लांडे, अर्शद शेख, कॉ. अॅड. सुधीर टोकेकर, भैरवनाथ वाकळे, सलिम सय्यद, संध्या मेढे, प्रा. गनी शेख, युनूस तांबटकर, फिरोज शेख, आबिद दुल्हेखान, पिरजादे आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांनी कदमराव पदमराव या दखनीतील आद्य काव्य ग्रंथावरील समीक्षा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं प्रसिद्ध केला. मराठी भाषेनं दखनी भाषेचा आधार घेऊन तिला समर्थ बनवून राष्ट्रभाषेच्या गौरवशाली शिखरावर कशा प्रकारे विराजमान केलं, याची प्रचिती हा ग्रंथ देत असून, या अख्यान काव्याच्या संशोधनाबद्दल त्यांना साहित्य अकादमीचा भाषा सन्मान जाहीर झाला आहे. प्रा. डॉ. मुहम्मद आझम यांना साहित्य अकादमीचा जाहीर झालेला हा भाषा सन्मान नगरच्या दृष्टीने भुषणावह बाब असल्याचे अर्शद शेख यांनी सांगितले. प्रा. डॉ. आझम यांनी दखनी भाषेचा इतिहास उलगडून, डाव्या पुरोगामी पक्ष व संघटनांच्या वतीने झालेल्या सत्काराने भारावलो असल्याची भावना व्यक्त केली.