• Wed. Dec 11th, 2024

ज्ञानोबा… तुकाराम… गजर करीत भिंगारला अवतरले बाल वारकरी

ByMirror

Jul 9, 2022

भिंगारला नवीन मराठी शाळेची दिंडी उत्साहात

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील अ.ए.सो.च्या नवीन मराठी शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेली बालवारकर्‍यांची दिंडी उत्साहात पार पडली. डोक्यावर टोपी, पायजमा, बंडी या पोशाखात लहान मुले तर रंगीबेरेंगी साड्या परिधान करुन डोक्यावर तुलस घेऊन मुली सहभागी झाल्या होत्या.

हातात भगवे ध्वज, टाळ-मृदूंगचा निनाद, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत निघालेल्या या दिंडीने नागरिकांचे लक्ष वेधले. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभुषेत सहभागी झालेले विद्यार्थी या दिंडीचे आकर्षण ठरले.


शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला कळमकर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करुन दिंडी सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी शालेय समितीचे चेअरमन नंदकुमार झंवर, शाळा समिती सदस्य संजय सपकाळ आदींसह पालक व शिक्षक उपस्थित होते.

नगर-पाथर्डी रोड, कॅन्टोमेंट रोड परिसर मार्गे बाल वारकरींनी रोकडेश्‍वर मंदिरा समोर फुगड्यांचा फेर धरला होता. भक्तिमय अभंग गायन व हरिनामाच्या गजराने परिसर भक्तीमय बनला होता. बाल वारकरींची दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती.

शाळेच्या प्रांगणात रिंगण सोहळा पार पडला. दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *