ज्ञान आणि धर्माला भगवान गौतम बुध्दांनी एक नवीन दिशा दिली -प्रा. पंकज लोखंडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानदीप फाऊंडेशनच्या वतीने बुध्द पौर्णिमेनिमित्त शहरातील सिध्दीबाग मधील भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. पंकज राजेंद्र लोखंडे, पँथर नेते मोहन ठोंबे, शलमोन भालेराव, शरद सरोदे, लक्ष्मण माघाडे, विजय जाधव, विजय दुबे, सोन्याबापू भाकरे, प्रा. पॉल भिंगारदिवे, सेवा निवृत्त अधिकारी रमेश आल्हाट, संतोष वाघ, सामाजिक कार्यकर्ते योगेश शिंगाडे, सनी साळवे, नितिन साठे, जावेद सय्यद, युसूफ शेख, सागर विधाते, गोरख पवार, अमित लोखंडे, जॉनसन लोखंडे, धिरज जाधव, प्रफुल्ल लोखंडे, सोन्याबापू गायकवाड, अनिवृद्ध दुबे, आदेश जाधव, शारदा साळवे, प्रांजली लोखंडे, वैष्णवी दुबे, अक्षदा साठे आदी उपस्थित होते.
प्रा. पंकज लोखंडे म्हणाले की, ज्ञान आणि धर्माला भगवान गौतम बुध्दांनी एक नवीन दिशा दिली. त्यांनी लोकांना सत्याचा मार्ग आणि सोप्या मार्गाचा अवलंब करायला शिकवले. त्यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी जगाला अहिंसा व सत्याचा मार्ग दाखविला. तत्कालीन रुंढी, अंधश्रध्दा नाकारुन त्यांनी एक साधा मानव धर्म स्थापन करुन, जगात शांतीचा संदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.