शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- जे.एस.एस. गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया यांना लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे झालेल्या या सोहळ्यासाठी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्रशांत भालेराव, ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके, नरेंद्र अंकुश आदी उपस्थित होते.
जे.एस.एस. गुरुकुलच्या वतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसह सर्वांगीन विकासासाठी विशेष महत्त्व दिले जात आहे. 2012 साली शैक्षणिक कार्यास सुरुवात करुन आनंद कटारिया यांनी प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळून आधुनिक पध्दतीचे शिक्षण देण्यावर भर दिला. राहाता येथील साध्वी प्रीति सुधाजी शैक्षणिक संकुलाचे सर्वेसर्वा इंद्रनभानजी डांगे यांच्या डांगे पॅटर्न अंतर्गत जे. एस. एस. गुरूकुलमध्ये शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांची आवड-निवड पाहून त्या दिशेने त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या सुप्तकलागुणांना वाव देण्यात येत आहे. कोरोनामुळे मुलांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी अधिकचे तास घेऊन संपूर्ण अभ्यासक्रम पुर्ण करण्यात आला. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर पासून ते वक्तृत्व उत्तम होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या नाविन्यपुर्ण उपक्रमासाठी प्राचाय कटारिया यांचा नेहमीच पुढाकार असतो. या सर्व उपक्रमाची दखल घेऊन कटारिया यांना या वर्षीचा लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड देण्यात आला आहे.