अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तपदी प्रा. माणिक विधाते यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जेऊर बायजाबाई (ता. नगर) ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब बनकर, सचिन गोरे, सोसायटी सदस्य आसाराम टापरे, विजय बनकर, अर्जुन कोथंबीरे, विजय कोथंबीरे, विजय शिंदे, दादा विधाते आदींसह गावकरी उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब बनकर म्हणाले की, प्रा. माणिक विधाते राजकारणात राहून प्रमाणिकपणे समाजकारण करत आहे. अनेक विद्यार्थी घडवून समाज घडविण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. मंदिराच्या विश्वस्तपदी त्यांची झालेली निवड ही प्रत्येक गावकर्यांसाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.